रोटरी रेल सिटीच्या अध्यक्षपदी डॉ.मकरंद चांदवडकर यांची निवड


भुसावळ : सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या अध्यक्षपदी भुसावळातील दंतरोग तज्ज्ञ डॉ.मकरंद चांदवडकर तर सचिवपदी आर्किटेक्ट सन्मीत पोतदार तर कोषाध्यक्षपदी सोनू मांडे यांची निवड करण्यात आली. 1 जुलै 2022 पासून नूतन पदाधिकारी पदभार घेतील. रोटरी रेल सिटीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड बिनविरोध करण्यात आली.

विविध क्षेत्रात भरीव योगदान देणार : डॉ.मकरंद
रोटरी रेल सिटीचे गत 21 वर्षांपासून जनमानसात मानाचे स्थान आहे, अशा संस्थेचे अध्यक्षपद भूषाविणे ही सन्मानाची बाब असून आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात भरीव योगदान देणार असल्याचे मनोगत डॉ.मकरंद चांदवडकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, रोटरी प्रांत 3030 मधील सर्व 97 रोटरी क्लबच्या आगामी अध्यक्ष आणि सचिव यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर नुकतेच जळगाव येथे पार पडले. हे शिबीर यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल डॉ मकरंद चांदवडकर व सन्मीत पोतदार यांचे सर्व रेल सिटी सदस्यांकडून अभिनंदन करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !