मुक्ताईनगरात मनसेतर्फे शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
मुक्ताईनगर : शहरातील प्रवर्तन चौकात ढोल-ताशांच्या गजरात व फटाके फोडून मनसेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरवात चौकात महात्मा फुले, शाहू, डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर, जमील देशपांडे, उपाध्यक्ष राहुल काळे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास पदाधिकारी श्रीराम भोई, रोशन कपले, मंगेश कोळी, सुनील कोळी, खामखेडा सरपंच पुंडलिक तायडे, मनीष खडसे, विवेक पाटील, गौरव दाणी, सचिन पाटील, पंकज बोहर्डे, धीरज पाटील, भूषण कोळी, मुकेश झाल्टे, मयूर यमदरे, निखील झनके, सुनील गायकवाड, कडू झाल्टे, प्रसाद पदशिवे, पंकज मोरे, गजानन पाटील, यश पाटील, कुंदन कोळी, मनसे सैनिक उपस्थित होते.


