खडका शिवारातून कांद्याच्या 15 गोण्यांची शेतातून चोरी


खडका : रावेर व यावल तालुक्यात शेतीमाल चोरीचे लोण आता भुसावळ तालुक्यातही पोहोचले आहे. खडका परीसरातील फेकरी, कंडारी व साकरी या मार्गावरील शेतांमधून कांदा चोरीचे प्रकार वाढले आहेत. खडका शिवारातील फेकरी रोड भागात दोन शेतकर्‍यांच्या शेतातून कांद्याच्या 15 गोण्यांची चोरी झाल्याचे उघड झाले.

अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्ताची मागणी
भुसावळ तालुक्याच्या शेतशिवारात चोर्‍या होत आहेत. खडका, किन्ही, साकरी, फेकरी परिसरात अनेक शेतकर्‍यांनी खांडणी करून कांद्याच्या गोण्या भरून ठेवल्या आहेत. व्यापारी खरेदीसाठी येत नसल्याने हा कांदा आठ ते 10 दिवस शेतात पडून राहतो. यामुळेच चोरट्यांना फावले आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री खडका येथील फेकरी रोडवरील बाळू सरोदे यांच्या शेतातून कांद्याच्या 12 गोण्या चोरट्यांनी रीक्षाचा वापर करून लांबवल्या तर कृष्णा भिरूड यांच्या शेतातील दोन गोण्या लांबवण्यात आल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !