मुक्ताईनगरचा पाणीपरवठा आजपासून सुरळीत

पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे : स्लॅबचे बांधकाम पूर्णत्वास


मुक्ताईनगर : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाकीवरील छताच्या स्लॅबचे काम पूर्णत्वास आल्याने शहराचा पाणीपरवठा मंगळवारी सकाळपासून सुरळीत होणार आहे. नियमित टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे यांनी दिली.

विस्कळीत पाणीपुरवठा होणार सुरळीत
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टाकीवर छत नसल्याने ही टाकी गेल्या कित्येक वर्षापासून तात्पुरते पत्रे टाकून या टाकीतून शहरात पाणीपुरवठा केला जात होता परंतु याच बरडवर अनेक मोकाट गुरे गवत चरण्यासाठी फिरताना दिसून येत होते त्यामुळे या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जर एखादी प्राणी पडून दुर्घटना घडू नये म्हणून पालिकेने या टाकीच्या संरक्षणार्थ टाकीवर स्लॅब टाकण्यासाठी प्रशासकीय सोपस्कार केले होते. गेल्या दोन आठवड्यापासून या स्लॅब संदर्भात सेंटिंग बांधणे, सिमेंट रेती, खडी वर पोहोचविणे आदी कामे आटोपून गेल्या तीन दिवसाआधी स्लॅबचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. सोमवार सायंकाळपासून टाकी भरण्याचे काम सुरू होईल व मंगळवारी पहाटे पासूनच शहरात टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !