सारोळा विकासो निवडणुकीत परीवर्तन पॅनलची सरशी
मुक्ताईनगर : मुक्ताई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, सारोळाची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2022 ते 2027 ची निवडणूक रविवारी सारोळ्यात झाली. त्यात परीवर्तन पॅनलने 13 पैकी 12 जागांवर विजय मिळवला.
विजयी उमेदवार व मिळालेली मते
विनोद पांडुरंग काटे (121), गजानन गुलाबसिंग पाटील (106),
ज्ञानेश्वर भीमराव गवळी (105) नंदा रघुनाथ काटे (104), संचलाल रामधन काटे (102), विलाससिंह जालमसिंह पाटील (102), अविनाश मोतीलाल काटे (99), संदीप दगडू काटे (99), विजाभजवविमा प्रवर्ग- सोमा गोविंदा दगडे (110), अनुसूचित जाती जमाती- विजय सुखदेव यमनेरे (111), इतर मागास वर्ग- सुनील बाजीराव काटे (119), महिला राखीव- गुंफाबाई मांगो पाटील (119), इंदूबाई सुधाकर काटे (107). निवडणूक निर्णय अधिकारी आर.बी.तडवी, सहकार विभागातील कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली तर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त राखला. सर्व विजयी उमेदवारांचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, अॅड.रोहिणी खडसे, योगेश कोलते, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र माळी यांनी अभिनंदन केले आहे.


