फैजपूरात स्वयंसिद्ध जुडो कराटे शिबिराला सुरुवात
युवतींनी स्वतःला कणखर बनवणे गरजेचे आहे : बापू हजबन
फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभाग आणि आणि युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वयंसिद्ध’ अभियान राबविण्यात येत असून विद्यार्थिनी शारीरिक व मानसिक दृष्टीने कणखर होन्यासाठी विद्यार्थिनींना ज्यूडो, कराटे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षक म्हणून चंद्रकांत सपकाळे व बापू हजबन मार्गदर्शन करीत आहेत.
नुकतेच शिबिराचे उद्घाटन
प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक बापू हजबन यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. बापू हजबन यांनी आपल्या मनोगतात समाजातील युवतींना स्वतःला निरामय व कणखर बनवणे गरजेचे असून दृष्ट प्रवृत्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक मुलीने कराटे व जुडोचे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे, असे आवाहन केले,
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे यांनी शिबिराला संबोधित करताना महाविद्यालयातील ‘युवती सभा’ युवतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात युवती सभा प्रमुख प्रा.डॉ.सविता वाघमारे यांनीही युवती सभेच्या माध्यमातून विद्यर्थिनींना मानसिक, शारीरिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, असे सांगितले.
यांची उपक्रमासाठी उपस्थिती
प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे, उपप्राचार्य प्रा.ए.जी.सरोदे, उपप्राचार्य डॉ.उदय जगताप, डॉ.डी.बी.तायडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जी.जी.कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी डॉ.राजश्री नेमाडे, डॉ.कल्पना पाटील, डॉ.जयश्री पाटील, डॉ.सरला तडवी, प्रा.विकास वाघूळदे, प्रा.पल्लवी भंगाळे, प्रा.शुभांगी पाटील, प्रा. डॉ.आरती भिडे, प्रा.वैशाली कोष्टी, प्रा.सुवर्णा चौधरी व शिक्षकेतर कर्मचारी गणेश चव्हाण, शेखर महाजन, धर्मेंद्र मोरे, सुरज चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सायली चौधरी तर आभार ज्ञानेश्वरी पाटील यांनी मानले.


