सावद्यात श्री स्वामी समर्थ केंद्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन


सावदा : शहरात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त सावदा येथील सुगंगा नगरात श्री स्वामी समर्थ केंद्राचे भूमिपूजन मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

अध्यात्मिक केंद्र होत असल्याचे समाधान : आमदार
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, श्री स्वामी समर्थ केंद्राचे भूमिपूजन आज आमच्या हस्ते करतांना आनंद होत असून एक आध्यात्मिक केंद्र होत असल्याने नागरीकांना या केंद्रात येऊन अध्यात्मिक साधना करता येईल. याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष सुरज परदेशी, भरत नेहेते, माजी नगराध्यक्षा अनिता येवले, माजी नगरसेविका नंदाबाई लोखंडे, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, शिवसेना शहर सचिव शरद भारंबे, नितीन महाजन, प्रमोद माळी, शुभम चौधरी यांच्यासह सुगंगा परीसरातील तसेच शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !