ऊसतोडीसाठी आलेली 29 वर्षीय विवाहिता बेपत्ता


शिरपूर : तालुक्यातील थाळनेर येथे ऊसतोड करण्यासाठी आलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील 29 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याप्रकरणी थाळनेर ठाण्यात पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली.

सांगवीतूून क्रुझर लांबवली ; शिरपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातून केले वाहन जप्त

बेपत्ता महिला येवला तालुक्यातील रहिवासी
नाशिक जिल्ह्यातील काही ऊसतोड मजूर तालुक्यात उस तोडीसाठी थाळनेर शिवारात आले असून थाळनेर येथील हेमंत चौधरी यांच्या शेतात व परिसरातील शेतात लागवड केलेल्या ऊसाची गेल्या 8 दिवसांपासून तोडणी सुरू असताना रविवार, 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास 29 वर्षीय महिला कोणास काही न सांगता कुठेतरी निघून गेली. तिचा परिसरात व फोनवरून नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नसल्याची तक्रार तिच्या 30 वर्षीच पतीने दाखल केली. दाखल तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात विवाहित महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास नाईक ललित खडगे करीत आहे.

शिरपूर तालुक्यात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील जावयासह सासरे जागीच ठार




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !