प्रवाशांना मोठा दिलासा : रावेर-कल्याण बस सुरू


रावेर : रावेर आगारातर्फे कोरोनापासून बंद असलेली लांब पल्ल्याची बस सेवा सुरू करण्यात आली असून त्यानुषंगाने रावेर-कल्याण बसचा शुभारंभ माऊली फाऊंडेशनचे डॉ.संदीप पाटील व पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

प्रवाशांना मोठा दिलासा
गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना व एस.टी.महामंडळ कर्मचायांच्या संपामुळे लांब पल्ल्याच्या बसेस बंद झाल्या होत्या. रावेर आगारातर्फे रावेर ते कल्याण ही बंस सेवा सोमवारी सायंकाळी 6 वाजता सुरू करण्यात आली. रावेर-कल्याण बसचा माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील यांच्याहस्ते पुजन व श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्याहस्ते चालक एस.के.सोनवणे व वाहक एच.वाय.साळुंके यांचा रूमाल, टोपी व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. आगार प्रमुख एन.टी. बेंडकुळे यांनी सांगितले की, रावेर-कल्याण तसेच बहाणपूर-सुरत या दोन लांबपल्ल्याच्या गाड्या आजपासून सुरूवात करण्यात आली. लवकरच इतरही मार्गावरील लांबपल्ल्याच्या गाडयांना सुरूवात करण्यात येईल. प्रसंगी वाहतूक नियंत्रक एस.के.पाटील, रोखपाल पी.जी.माळी, सदानंद महाजन, अरुण चौधरी, कैलास केंद्रे, शाम भामरे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !