कुंभारखेड्यात संगीतमय श्रीमद् दशावतार कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाला सुरूवात


फैजपूर : रामकृष्ण हरी भजनी मंडळ व समस्त गावकर्‍यांच्या सहकार्याने कुंभारखेडा, ता.रावेर येथील रामनगर येथे संगीतमय श्रीमद् दशावतार कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाला (सजीव देखाव्यासह) बुधवारपासून सुरूवात झाली. हा सप्ताह 13 एप्रिल 2022 पर्यंत चालणार आहे. सतपंथ संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज हे अमृत वाणीतून या कथेचे निरूपण करतील. कथे दरम्यान श्री मत्स्य अवतार, वराह अवतार, वामन अवतार, सीता स्वयंवर रामायण, श्री कृष्ण लीला चरित्र, बुद्ध अवतार, सुदामा चरित्र, श्री निष्कलंकी अवतार चरीत्र आदींसह संगीतमय सजीव देखावा प्रसंग भाविक भक्तांना बघायला मिळणार आहे.

विविध धार्मिक कार्यक्रम
कथेदरम्यान रात्री आठ ते दहा हरी संकीर्तन, दररोज पहाटे पाच ते सहा काकडा आरती, सहा ते सात विष्णू सहस्रनाम, दुपारी 12 ते पाच श्रीमद दशावतार कथा, सायंकाळी सहा ते सात हरीरपाठ व रात्री आठ ते दहा हरी कीर्तन होत आहे. सप्ताहाची सांगता बुधवार, 13 एप्रिल रोजी होईल. दुपारी 12 ते 5 दरम्यान महाप्रसाद व संध्याकाळी सहा ते नऊ दिंडी सोहळा निघेल. बुधवार, 6 एप्रिलपासून अनुक्रमे हभप ज्ञानेश्वर महाराज मेहूण, हभप प्रल्हाद शास्त्री महाराज सिन्नर (नाशिक), हभप ब्र.हरीदास महाराज, पळसखेड (बुलढाणा), हभप दीपक महाराज रेलकर (धरणगाव), हभप नागेश्वरी महाराज झाडे (आळंदी), हभप डॉ.जलाल महाराज सैय्यद (करंजीकर), हभप विजय महाराज (मुक्ताईनगर) व अखेरच्या दिवशी हभप तुकाराम महाराज (चिंचोली) यांचे सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तन होईल. भाविक भक्तांनी या कथा, हरी संकीर्तन सप्ताहाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कुंभारखेडा येथील रामकृष्ण हरी भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळ यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !