बोदवडमधील लाच प्रकरणात पकडण्यात आलेले तहसीलदार तर निरपराध !
बोदवडमधील सर्व पक्षीयांनी केला दावा : जिल्हाधिकार्यांना निवेदन
बोदवड : आठ हजारांच्या लाच प्रकरणी बोदवड तहसीलदार योगेश्वर टोंपे यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती मात्र या कारवाईची सखोल चौकशी करून निरपराध व्यक्तीला न्याय द्यावा, अशी मागणी बोदवडमधील सर्व पक्षीयांनी जळगाव जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, नगराध्यक्ष, व्यापारी संघटना बोदवड, डॉक्टर असोसिएशन बोदवड, किसान एकता संघ, दिल्ली, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था बोदवडच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
बोदवड तहसीलदार प्रामाणिकच : विविध पक्षांचा दावा
निवेदनाचा आशय असा की, विविध पक्षांचे पदाधिकारी तहसीलदार टोंपे यांच्याकडे घेवून गेल्यानंतर त्यांनी नेहमीच जनतेची कामे करून दिली शिवाय कुणाकडून पैसे मागितल्याचे ऐकीवात नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल लाच, मोबदला, लाभ, बक्षीस मागितले नसताना त्यांच्यावर अलिकडे झालेली एसीबीची कारवाई पाहता अवैधरीत्या वाळू वाहतुकीचा व्यवसाय करणार्या व्यावसायीकाने एकूणच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
यांनी दिले निवेदन
निवेदन देताना बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष भारत पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजेश नानवाणी, किसान एकता संघाचे विनोद पाडर, डॉक्टर असोसिएशनचे डॉ.सुधीर पाटील, स्वामी विवेकानंद संस्थेचे गोपाळ पाटील, माजी नगराध्यक्ष सईद बागवान, उपनगराध्यक्ष संजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख राहुल शर्मा, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील, नगरसेवक प्रीतेश बरडीया, माजीनगर सेवक धनराज गंगतीरे, कुर्हा हरदो सरपंच भगवान महाले, सुभाष देवकर, तानाजी पाटील, अमीन मण्यार आदी उपस्थित होते.
नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला अपघात : सीआरएस चौकशीत 15 जणांचे जवाब नोंदवले


