भुसावळात रस्त्याच्या कामामुळे शहरवासीयांमधून समाधान


भुसावळ : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून मंजूर महात्मा गांधी पुतळा ते कडू प्लॉट या रस्त्यावर सीलकोट व कारपेटच्या अपूर्ण कामाला मंगळवारपासून सुरूवात करण्यात आल्याने शहरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रलंबित कामे होत असल्याने दिलासा
भुसावळ शहरातील ठेकेदाराने शहरातील नगरोत्थान महाअभियानातून मंजूर चार रस्त्यांची कामे घेतली आहेत. यातील दोन कामे पूर्ण झाली असून गडकरी नगरातील रस्त्यांच्या कामाला सुरवात झालेली नाही तर जळगाव रोडवरील गांधी पुतळा ते कडू प्लॉट या रस्त्याचे सिलकोट व कारपेटची कामे रखडली होती. समजलेल्या माहितीनुसार, पालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार संबधीत ठेेकेदाराने या मार्गावरील सिलकोट व कारपेटचे काम पूर्ण केल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अपूर्ण कामांचाही तिढा सुटण्याची अपेक्षा
पालिकेने विशेष रस्ता अनुदानातून होणार्‍या 12 कोटींची कामे करणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याने ही कामे ठप्प झाली आहेत. आता आगामी काळात हे रस्ते कधी पूर्ण होतील? याची प्रतीक्षा शहरवासीयांना लागली आहे. पालिका प्रशासन व ठेकेदाराने तिढा सोडवून शहरातील अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अशी अपेक्षा शहरवासी व्यक्त करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !