Supriya Sule हल्ला दुर्दैवी मात्र आताही एस.टी. कर्मचार्‍यांशी बोलायला तयार : सुप्रिया सुळे


Supriya Sule मुंबई : ‘सिल्वर ओक’वरील परीस्थिती चिघळल्याचं लक्षात येताच मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीने दाखल झाला. मुंबई पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील देखील पोहोचले. यावेळी सुप्रिया सुळेंना एस.टी.कर्मचार्‍यांनी घेराव घातला, यावेळी त्यांनी आंदोलकांशी बोलण्यास तयार असल्याचे हात जोडून सांगितले मात्र आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते.

हल्ला अत्यंत दुर्दैवी : सुप्रिया सुळे
मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आज माझं कुटुंब वाचलं. मी मुंबई पोलिसांचे आभार मानते. आज जो माझ्या घरावर झालेला हल्ला आहे तो अत्यंत दुर्देवी आहे. मी आताही एसटी कर्मचार्‍यांशी बोलायला तयार आहे. मी येथे आल्यापासूनच त्यांना हातजोडून विनंती करत होते की माझी आता या क्षणाला तुमच्याशी बोलायची तयारी आहे, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.






 

धक्कादायक ! : एस.टी.कर्मचारी आक्रमक : शरद पवारांच्या बंगल्यात चपला फेकल्या, दगड भिरकावले



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !