धक्कादायक ! : एस.टी.कर्मचारी आक्रमक : शरद पवारांच्या बंगल्यात चपला फेकल्या, दगड भिरकावले


ST WORKERS ATTACK SHARAD PAWAR HOUSE मुंबई : संतप्त एसटी कर्मचार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन करीत दगड भिरकावले शिवाय चपलाही फेकल्याने खळबळ उडाली आहे. (ST WORKERS ATTACK SHARAD PAWAR HOUSE) अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरीष्ठ अधिकारी सिल्व्हर ओकला दाखल झाले. संतप्त एस.टी. कर्मचार्‍यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी सरकारविरोधात जोदार घोषणाबाजी केली.

117 कर्मचार्‍यांच्या आत्महत्येनंतरही दखल नाही
शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्मचार्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. एसटी विलिनीकरणासाठी 117 एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. मात्र सरकार एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शरद पवारांच्या घरावर आंदोलन होत असल्याचं समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचेही कार्यकर्ते पवारांच्या घराबाहेर जमले.

सदावर्तेंना सोडणार नाही
यावेळी राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे (Narendra Rane) यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनीच कर्मचार्‍यांनाच भडकावून शरद पवारांच्या घरी हल्ला करण्यास सांगितले. अनेक कर्मचारी दारू पिऊन याठिकाणी आले होते. सदावर्तेंना आम्ही सोडणार नाही. हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं असे आव्हान त्यांनी केले. आझाद मैदानावर संप चालू होता. सरकारशी बोलणी सुरू होती. कोर्टात प्रकरण आहे. कर्मचार्‍यांना बोलण्याची संधी दिली होती. मात्र याप्रकारचा हल्ला खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

माजी मंत्री खडसेंसह स्वीय सहाय्यकांसह तत्कालीन भाजपा पदाधिकार्‍यांचा फोन टॅप : पडद्यामागील मुख्य सूत्रधार समोर येण्याची अपेक्षा

सरकारला विषय हाताळला आता नाही : पंकजा मुंडे (Pankaja Munde)
आतापर्यंतच्या इतिहासात ज्येष्ठ नेत्याच्या घरी हल्ला झाला नव्हता. सरकारने संबंधित मंत्र्यांनी हा विषय हाताळायला हवा होता. मात्र तसे झाले नाही असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेली अनेक दिवस एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू होते. सरकारला हा विषय नीट हाताळता आला नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत.

‘आयएनएस विक्रांत’ साठी गोळा केलेल्या पैशांचे काय केले विचारताच किरीट सोमय्यांचा पत्र परीषदेतून काढता पाय

चपलांसह दगड भिरकावले
अनेक संपकरी एस.टी.कर्मचार्‍यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. (ST WORKERS ATTACK SHARAD PAWAR HOUSE) अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचार्‍यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यानंतर आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्व्हर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

हल्ला दुर्दैवी मात्र आताही एस.टी. कर्मचार्‍यांशी बोलायला तयार : सुप्रिया सुळे


कॉपी करू नका.