आरटीई अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील 130 विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेशासाठी निघाली सोडत

प्रवेशाबाबतचा एसएमएस पालकांच्या मोबाईलवर : पुण्यात निघाली सोडत


मुक्ताईनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) तालुक्यातील 11 इंग्रजी माध्यम व दोन सेमी इंग्रजी माध्यम अशा 11 शाळांमध्ये 130 विद्यार्थ्यांना 2022-23 साठी इयत्ता पहिली मध्ये प्रवेशाची सोडत पुणे येथे काढण्यात आली. प्रवेशाबाबतचा एसएमएस पालकांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आले आहेत. 20 एप्रिलपर्यंत पालकांना संबंधीत शाळेत पाल्याचा प्रवेश घ्यावयाचा आहे.

शिक्षणाधिकारी कार्यालयात बैठक
मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी पालकांना मुक्ताईनगर येथील समग्र शिक्षण अभियान कार्यालयात पंचायत समितीजवळ येथे यायचे आहेत. यासाठी आरटीई कागदपत्रे पडताळणी समिती अध्यक्ष गटशिक्षणधिकारी बी.डी.धाडी यांच्या उपस्थितीत बीईओ कार्यालयात शुक्रवारी झाली. समिती सदस्यांना बीईओ धाडी व शिक्षण विस्तार अधिकारी राजु तडवी यांनी मार्गदर्शन केले.

या शाळांमध्ये मिळणार विद्यार्थ्यांना प्रवेश
इंग्रजी माध्यम शाळा- सौ.के.टी.महाजन प्रायमरी शाळा अंतुर्ली (11 जागा), समर्थ इंग्लिश मेडीयम शाळा, अंतुर्ली (10 जागा),
अभिनय इंग्लिश मेडीयम शाळा, अंतुर्ली (10 जागा), आदर्श इंग्लिश मेडीयम शाळा मुक्ताईनगर (17 जागा), डॉ.जगदीश पाटील इंग्लीश मेडीयम सीबीएससी शाळा मुक्ताईनगर (15 जागा), श्री एकनाथराव खडसे टॅलेंट सीबीएससी शाळा मुक्ताईनगर (8 जागा), सरस्वती इंग्लिश मेडीयम शाळा, उचंदे (9 जागा), मुक्ताई इंग्लिश मेडीयम शाळा, उचंदे (12 जागा). नवनाथ इंग्लिश मेडीयम शाळा, वढोदे (8 जागा), संत मुक्ताबाई इंग्लिश मेडीयम शाळा, मुक्ताईगर (7 जागा).

सेमी इंग्लिश (मराठी माध्यम)-
स्व.निखील खडसे सेमी इंग्लिश मेडीयम शाळा, मुक्ताईनगर (23 जागा) दरम्यान, 130 विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीत नंबर लागला आहे. पालकांकडून सर्व कागदपत्रांची पडताळणी गटशिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती बीईओ यांच्या कार्यालयात करणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी बी.डी.धाडी म्हणाले.

यांची बैठकीला उपस्थिती
विस्ताराधिकारी राजू तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार पाठक, केंद्रप्रमुख संजय ठोसर, शासकीय आश्रमशाळा जोंधनखेडा मुख्याध्यापक सचिन गायकवाड, सुकळी नवीन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप दाणे, मुक्ताईनगरच्या संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन काटे, मुक्ताईनगरच्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक नितीन पवार, मुक्ताईनगरातील जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक दीपक गोसावी, जे.ई.स्कूलचे मुख्याध्यापक आर.पी.पाटील, शिक्षण संस्था प्रतिनिधी बाळकृष्ण राणे, पालक संस्थाचे प्रतिनिधी शंकर चिखलकर, शिक्षकांचे प्रतिनिधी सुनील आढांगळे, जि.प.शाळा मुख्याध्यापक धनलाल भोई, पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी संदीप जोगी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी धनंजय सापधरे, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी सुमित शर्मा उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !