भरधाव कंटेनरची बुलेटला धडक : चाळीसगावातील प्राचार्य जागीच ठार


Chalisgaon Accidant चाळीसगाव : भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत चाळीसगावच्या शांतीदेवी पॉलिटेक्नीक महाविद्यालयाचे प्राचार्य जागीच ठार झाले. हा अपघात शनिवार, 9 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धुळे रोडवरील शांतीदेवी कॉलेजजवळ घडला. दीपक आधार पाटील (45, भामरे, ता.चाळीसगाव) असे मयत प्राचार्यांचे नाव आहे.

भुसावळात भर वस्तीत ट्रक शिरला : तरुणाचा जागीच मृत्यू ; जमाव संतप्त 

दुचाकीला उडवल्याने प्राचार्यांचा मृत्यू
चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील रहिवासी दीपक आधार पाटील (45) हे शनिवारी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकी बुलेट (एम.एच.19-6237) ने निघाले असतानाच भरधाव कंटेनर (आर.जे. 14 जी.जे.8508) ने बुलेटला जोरदार धडक दिल्याने दीपक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पाटील यांच्या खिशातील कागदपत्रे रस्त्यावर पडली व त्यातील ओळखपत्रामुळे लागलीच त्यांची ओळख पटली. ग्रामीण पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत कंटेनर ताब्यात घेतले. प्राचार्यांच्या अपघाती मृत्यूमुळे भामरे गावात शोककळा पसरली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !