स्व.हरीभाऊ जावळे मार्ग फलकाचे अनावरण
सावदा : सावदा येथून न.पा.हद्दीतून जाणार्या आमोदा-भिकनगाव हायब्रीड वे हायवेस लोकनेते स्व.हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्याचा ठराव सावदा पालिकेने पूर्वीच मंजूर केला होता. रामनवमीच्या मुहूर्तावर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, शास्त्री भक्तीकिशोरदासजी व महंत सुरेशराजशास्त्री मानेकर बाबा यांच्याहस्ते या रस्त्याचे नियोजीत स्व.हरीभाऊ जावळे मार्ग असे फलक अनावरण करण्यात आले. यावेळी सर्व पक्षीय नेते व कार्यकर्तेउपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी स्व.हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदूभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राजेंद्र, चौधरी, भरत महाजन, यावल येथील शिवसेनेचे मुन्ना पाटील, डॉ.कुंदन फेगडे, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, सावदा येथील माजी नगरसेवक फिरोजखान हबीबुल्ला खान पठाण, अरुण चौधरी, रावेर येथील सुरेश धनके, अरुण चौधरी, पिंटू राणे, माजी नगरसेविका लीना चौधरी, रंजना भारंबे, बेटी बचावच्या सारीका चव्हाण, रेखा बोंडे, श्रीकांत महाजन, ललित बोंडे, डॉ.विजय धांडे, हिरालाल पाटील, सुरज परदेशी यांच्यासह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
