यावल शिवारातील शेतातून पाईप लांबवले
यावल : यावल शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी पाईप लांबवले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेती साहित्याच्या चोर्या वाढल्या
चंद्रकांत पंडित चौधरी (58, देशमुख वाडा, यावल) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्या असून त्यांच्या मालकीचे पाण्याचे पाईप यावल शिवारातील रमेश अतुल देशमुख यांच्या शेतात ठेवण्यात आले होते. रविवार, 10 एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी शेतातील पाईप लांबवले. मंगळवारी रात्री 10 वाजता यावल पोलिस ठाण्यात धाव घेवून त्यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.
