अवैध धंदे चालकांची मुजोरी ; मुक्ताईनगरात तीन पत्रकारांवर हल्ला !


मुक्ताईनगर : खुलेआमपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची बातमी दिल्याचा राग आल्यानंतर धंदे बंद झाल्याने संतप्त झालेल्या अवैध व्यावसायीकांनी शहरातील तीन पत्रकारांवर हल्ला केल्याने या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रसारमाध्यमांमध्ये अवैध धंद्यांबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याचा राग आल्याने अवैध धंदे चालकांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकारांवर हल्ला
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात खुलेआमपणे चालणार्‍या अवैध व्यवसायाबाबत वृत्त आल्यानंतर अस्वस्थ झालेल्या सटोडियांनी मध्यस्थाच्या माध्यमातून धमकी दिली होती. यानंतर मंगळवारी रात्री पत्रकारांच्या मोटरसायकलवर दगडफेक करण्यात येऊन गाडीचे नुकसान केले. हॉटेल यादगारजवळ दोन संशयीतांनी
पत्रकार पंकज तायडे यांच्या मोटरसायकलीच्या समोरील काच, इंडिकेटर तोडून नुकसान केले. पंकज कपले यांच्या पायावर काठीने मारहाण करण्यात आली तर अक्षय काठोके यांच्या हाताला मार लागलीा. पत्रकार पंकज कपले आणि अक्षय काठोके यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !