पोलिस प्रशासनाची मोठी कारवाई : भुसावळ विभागातील 35 अवैध दारू विक्रेते ताब्यात
भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. शहरासह उपविभागात पोलिस प्रशासनाने काटेकार बंदोबस्त तैनात केला असून तब्बल 35 अवैधरीत्या दारू विक्री करणार्या विक्रेत्यांना ताब्यात घेवून डीटेन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी मिरवणुका संपल्यानंतर संबंधितांना पोलिस स्टेशनमधून मुक्त करण्यात येणार आहे. प्रथमच अशा पद्धत्तीने कारवाई झाल्याने अवैधरीत्या दारू विक्री करणार्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
रेकॉर्डवरील विक्रेत्यांवर कारवाई
भुसावळ शहर, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेते त्याचप्रमाणे भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील ज्या गावांमध्ये महामानव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका आहेत त्या गावातील अवैधरीत्या दारू विक्री करणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांचे पथक सातत्याने अवैध दारू विक्री करणार्यांवर लक्ष ठेवून आहे.
