अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी जाळ्या चोरीला : रावेरातील प्रकार
रावेर : रावेर शहरातील नागझिरी रोडवर असलेल्या स्मशानभूमीतुन अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी जाळ्या चोरुन नेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत रावेर पोलिस स्टेशनला एकाविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
रावेर शहरातील नागझिरी रोड , रसलपुर रस्त्यावरील स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणारे आठ हजार रुपये किंमतीच्या एकूण बारा लोखंडी जाळ्या आरोपी रफीक गढेवाला (पूर्ण नाव माहीती नाही) याने चोरुन नेल्या आहे. ही घटना १ एप्रील ते १२ एप्रीलच्या दरम्यान घडली. बुधवार, १३ रोजी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुरुवारी दुपारी वॉचमन संजय वसंत महाजन (४८) यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विष्णु भिल, विष्णु पोहेकर करीत आहे.
