भुसावळात महिलेचा विनयभंग करीत जातीवाचक अश्लील शिविगाळ : दोघांविरोधात गुन्हा


भुसावळ : बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्याचा राग आल्यानंतर दोघा संशयीत आरोपींनी 28 वर्षीय महिलेस अश्लील शिविगाळ करीत मारहाण केली व वाद सोडवण्यासाठी महिलेचा दीर आल्यानंतर त्यासही मारहाण करण्यात आली. जामनेर रोडवरील भिरूड हॉस्पीटलमागील कृष्णा नगरात ही घटना शनिवार, 16 रोजी रात्री 12.15 वाजता घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी धनंजय उर्फ गोलू दत्तु बाणाईत व तुषार अशोक पवार (कृष्णा नगर, भुसावळ) यांच्याविरोधात अ‍ॅट्रासिटी कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग
तक्रारदार महिलेचे माम दिर यांनी 6 मार्च 2022 रोजी संजय अशोक बाविस्कर, योगेश सुभाष पवार (कृष्णा नगर, भुसावळ) कृष्णा सुतार (कोलते गल्ली, भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली होती व या तक्रारीचा राग मनात ठेवून संशयीत धनंजय उर्फ गोलू दत्तु बाणाईत व तुषार अशोक पवार यांनी शनिवारी रात्री 12.15 वाजेच्या सुमारास 28 वर्षीय महिलेस अश्लील शब्दात शिविगाळ करीत गालावर चापट मारली तसेच हा वाद सोडवण्यासाठी महिलेचे दीर निलेश आल्यानंतर त्यांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ करण्यात आली. दरम्यान, पीडीतेने बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोघा संशयीतांविरोधात अ‍ॅट्रासिटी व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !