रावेरात 8 मे रोजी बौध्द समाजाचा सामूहिक विवाह सोहळा
रावेर : फुले-शाहू-आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व समस्त बौध्द समाज, रावेर तालुका यांच्या विद्यमाने 8 मे रोजी बौध्द समाजाचा सामूहिक विवाह सोहळा रावेर शहरातील सरदार जी.जी.हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मैदानावर होत आहे.
वधू-वरांना मिळणार अनुदान
सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज आहे त्यामुळे वेळ, पैसा, श्रमाची बचत होवून समाजात एकोपा निर्माण होऊन सामाजिक विकासाला हातभार लागतो. विवाह नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन सामूहिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी केले आहे. जास्तीत-जास्त संख्येने नोंदणी केलेल्या उपवर-वधूंसाठी समाजकल्याण विभागामार्फत कन्यादान योजनेतून 20 रुपये अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाच्या लाभासाठी उपवर-वधूने शाळा सोडल्याचे दाखले, जातीचे दाखले, अधिवास दाखले, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो व विवाह झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत विवाह नोंदणी दाखला आणणे बंधनकारक असणार आहे.

मोठ्या संख्येने नोंदणीचे आवाहन
बौद्ध समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांची नावे जास्तीत-जास्त संख्येने नोंदणीसाठी फुले-शाहु-आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, तहसील कार्यालयासमोर, रावेर येथे करून सामूहिक विवाह सोहळा समितीस सहकार्य करावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.