यावल-भुसावळ बसवर चिंचेचे झाड आदळले : 13 प्रवासी जखमी
Yawal Bus Accidant यावल : यावल एसटी आगारातून भुसावळकडे निघालेल्या धावत्या बसवर चिंचेचे झाड कोसळले. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घोडे पीर बाबा दर्गाह परीसरात ही अपघात (Yawal Bus Accidant) झाला. त्यात चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, 29 पैकी 13 जणांना किरकोळ दुखापती झाल्या. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पारोळा शहराजवळ दरोडा : तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
13 प्रवासी जखमी
यावल आगारातून (एम.एच.20 बी.एल.2542) या क्रमांकाची बस दुपारी दिड वाजता यावलकडून भुसावळसाठी प्रवासी घेवून निघाली होती. ही बस पाटचारीच्या पुढे घोडेपीर बाबा दर्गाह जवळ आलेली असताना वेगाचे वारे वाहत होते. यावेळी चिंचेचे एक झाड कोसळून धावत्या बसकडे झुकले. हे चित्र डोळ्यासमोर पाहून चालक शालिक बारी यांनी प्रसंगावधान राखून बसचा वेग कमी केला. यामुळे सर्व प्रवासी बालंबाल बचावले मात्र पडलेल्या झाडामुळे बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. गाडीतील 13 प्रवासीदेखील किरकोळ जखमी झाले.
पुण्यातील सातव्या अ.भा.मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनासाठी जिल्ह्यातून चित्रकार कवी दिनेश चव्हाण मुख्य निमंत्रीत
प्रवाशांवर तातडीने प्रथमोपचर
अपघाताची (Yawal Bus Accidant) माहिती मिळताच यावल आगाराचे व्यवस्थापक जी.पी.जंजाळ यांनी सर्व प्रवाशांना रुग्णालयात आणण्याची व्यवस्था केली. हा अपघात झाला तेव्हा किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन या भागातून जात होत्या. त्यांनी तातडीने मदत केली. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.मनीषा महाजन, अधिपरीचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, वैशाली बैरागी, पूनम सोनवणे, हेमलता कावडकर, पिंटू बागुल, इरफान तडवी आदींनी प्रथमोपचार केले. आगार व्यवस्थापक जी.पी. जंजाळ, वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे, सहायक वाहतूक निरीक्षक कमलाकर चौधरी, वाहतूक नियंत्रक के.डी.चौधरी, डी.एन.ठाकरे आदींकडून किरकोळ जखमींना 500, तर जास्त प्रमाणात जखमींना प्रत्येकी एक हजार अशी 10 प्रवाशांना सहा हजारांची मदत करण्यात आली आहे.
हे प्रवासी अपघातात झाले जखमी
चालक शालिक बारी, वाहक एस.पी.महाजन, जहांगीर तडवी (वय 34, रा.चुंचाळे), कल्पना सतीश चौधरी (वय 55, रा.डोंबीवली), मंगला चौधरी (वय 55, रा.वडोदा), दीपक वानखेडे (वय 24, रा.चुंचाळे), इच्छाराम राजपूत (वय 70, रा.सांगवी खुर्द), पंडित परणकर (रा.यावल), शकुंतला चौधरी (वय 60, रा.धानोरा), दीपक वानखेडे (वय 24, रा.चुंचाळे बोराळे), पद्माबाई कोळी (वय 50, निमगाव), सुशीलाबाई धनगर (वय 42, मुक्ताईनगर), नीलम पाटील (वय 17, रा.दहिगाव), जोहराबाई खाटीक (वय 50, रा.अडावद), शिवाजी गजरे (रा.चुंचाळे).
बस चालक बारींनी सांगितला थरार
आम्ही साधारण एक वाजता यावलहून निघालो. मी नेहमीसारखा रस्त्यावरील स्थिती व आजूबाजूला लक्ष ठेवून बस चालवत होते. मात्र, पाटचारीच्या पुढे घोडे पीर बाबा दर्गाह परीसरात असताना अचानक वार्याचा वेग वाढला. सुकलेल्या भल्यामोठ्या चिंचेच्या झाडाजवळ भोवरी तयार झाली. त्यात झाड कोसळू शकते, असा अंदाज आला. यावेळी आमची बस सुमारे 55 ते 60 किमी प्रतितास वेगात होती. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी गिअरमध्ये गाडी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करून वेग 30 पर्यंत खाली आणला. पडणार्या झाडापासून वाचण्यासाठी गाडी रस्त्याच्या विरूद्ध दिशेला नेऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही बसच्या समोरील भागावर चिंचेच्या झाडाची फांदी पडून दुर्घटना झाली. मात्र, वेग नियंत्रणात आला नसता तर भलेमोठे झाड बसच्या मधोमध पडून अनेकांच्या जीवावर बेतले असते. सुदैवाने हा प्रसंग टळल्याचे बसचालक शालिक बारी यांनी सांगितले.