मध्यप्रदेश आगाराच्या वाहनाला कर्की फाट्यावर अपघात : वाहकाचा मृत्यू


मुक्ताईनगर : मध्यप्रदेश आगाराच्या प्रवासी बसला मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्यावर अपघात झाल्याने वाहकाचा जागीच मृत्यू झाला तर 15 प्रवासी जखमी झाले. जखमीतील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक रवाना झाले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.

भुसावळ नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आठ हरकती दाखल 

शेतात उलटली बस
मध्यप्रदेशातील उज्जैन येवून शेगावला जाणारी मध्यप्रदेश परीवहन मंडळाची बस क्रमांक (एम.पी.13 पी.1343) ही गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्याजवळून जात असतांना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलट्या दिशेने मागे जात थेट शेतात जावून उलटली. यात अपघातात वाहक हा जागीच ठार झाला तर 15 प्रवाशी जखमी झाल्याचे समजते.



पोलिसांची अपघातस्थळी धाव
जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे. दरम्यान मयत आणि जखमींची नावे अद्याप कळू शकलेली नाही.

भुसावळ शहरात उद्या भीमगीतांचा कार्यक्रम : उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती 

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !