भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार
भुसावळ : भारत सरकारने 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली असून याच अंतर्गत देशातील सर्व शाळांसाठी सुरू केलेल्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार यावर्षी भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूलने पटकावला आहे.
जळगावात पुरस्काराचे वितरण
या पुरस्काराचे वितरण शनिवार, 18 जून रोजी जळगाव येथे करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय, अनुदानित व खाजगी शाळांनी पुरस्कारासाठी नामांकन सादर केले. त्यात बियाणी मिलिटरी स्कूलने फाईव्ह स्टार रेटिंग मिळवले. शालेय व्यवस्थापनासोबत शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.