खिर्डीत वादळी वार्याने दोन विद्युत खांब कोसळले : सुदैवाने नागरीक बचावले
खिर्डी : खिर्डीसह परीसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वार्यास सुरू झाल्यानंतर गावातील विठ्ठल ओंकार पांडव यांच्या घराच्या ओट्यावर व पत्रांवर सिमेंटचे काँक्रीटचे दोन विद्युत खांब तुटून पडल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट उडाली मात्र सुदैवाने या दुर्घटनेत नागरीक बचावले तर वीजपुरवठा खंडित झाला.
सुदैवाने प्राणहानी टळली
रविवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाल्यानंतर पावसाच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली तर रात्रीच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन वादळी वार्यासह पाऊस सुरू असतानाच विठ्ठल ओंकार पांडव यांच्या घरासमोरील सिमेंट काँक्रिटचे दोन विद्युत खांब तुटून खाली पडले. एक वीज खांब रस्त्याच्या मधोमध पांडव यांच्या घराच्या ओट्यावर व पत्र्यांवर पडला व विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने त्यामुळे सुदैवाने या भागात मोठी जीवितहानी टळली. या भागातील वीजपुरवठत्त खंडित झाला आहे.