चोरट्यांचा मोर्चा भालोदमधील मंदिरांकडे : भाविक संतप्त

श्री एकविरा व म्हाळसा देवी मंदिरातून तीन पितळी घंटा चोरीला : चोरट्यांचा उपद्रव थांबवण्याची अपेक्षा


यावल : तालुक्यातील भालोद येथील श्री एकविरा व म्हाळसा देवी मंदिरातून चोरट्यांनी मंदिरातील तीन पितळी घंटा चोरी केल्याचे रविवारी सांयकाळी उघडकीस आल्याने भाविकांमधूनप संताप व्यक्त होत आहे. चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली असून तालुक्यातील विविध मंदिरातुन मोठ्या प्रमाणात पितळी घंटे चोरी जात असल्याने या चोरट्यांचा बंदोबस्ताची मागणी होत आहे.

गाव परीसरातील चोरट्यांवर संशय
भालोद, ता.यावल या गावात श्री एकविरा व म्हाळसा देवी मंदिर आहे. या मंदिरात विविध ठिकाणी तीन पितळी घंटे लावण्यात आले होते. रविवारी सायंकाळी भाविक जेव्हा मंदिरात दर्शनास पोहेचले तेव्हा मंदिरातील तीन्ही घंटे जागेवर नव्हते. देविदास चौधरी यांनी मंदिराचे ट्रस्टी नारायण चौधरी, राजेंद्र नेहेते, शिरीष नेहेते यांना फोन करून ही माहिती सांगितली. घटनेची आजू बाजूस चौकशी करून पाहणी केली असता चोरी गाव परिसरातील चोरांनी केल्याचा संशय आहे. यावल तालुक्यातील व भुसावळ,जळगाव येथील भांडे दुकानदारांनी घंट्याची मोड स्वीकारू नये व संशय असल्यास पोलिसांना लगेच कळवावे, असे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे.

विधान परीषद निवडणुकीत नाथाभाऊंचा दणदणीत विजय


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !