रावेरात मद्यपी चालकांची पोलिसांनी उतरवली झिंग
रावेर : रावेर शहरात दारू पिऊन गाडी चालवणार्या सहा वाहन धरकांविरोधात रावेर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्याने वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पक्षांतर बंदी कायद्याचा असा आहे निर्णय : एकनाथ शिंदेच्या निर्णयाकडे लक्ष
कारवाईत सातत्य राखण्याची मागणी
रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दाऊ पिऊन मोटारसायकल चालवणार्या दोघा तर चार चारचाकी वाहन चालवणार्यांवर रावेर शहरात पोलिस कर्मचारी भागवत धांडे, पोलिस कर्मचारी सोनवणे यांनी दंडात्मक कारवाई केली. वाहन चालवताना नियमान्वये कागदपत्रे बाळगावीत, दारू प्राशन करून वाहन चालवणे कायद्याने गुन्हा असून कायद्याचे नियमन पाळावेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी केले आहे.
