आमदार एकनाथराव खडसेंच्या विजयानंतर भुसावळात दुचाकी रॅली काढून जल्लोष


भुसावळ : विधान परीषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे हे विजयी झाल्यानंतर भुसावळातील समर्थकांनी मंगळवारी सायंकाळी दुचाकी रॅली काढून जल्लोष केला. ओबीसी समाजाचा चेहरा व जिल्ह्याला न्याय देणारे नेतृत्व म्हणून नाथाभाऊंकडे पाहिले जाते त्यामुळे सर्वसामान्यांपासून राजकीय पदाधिकार्‍यांपर्यंत सर्वांना खडसेंविषयी आदर आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत खडसे हे विजयी झाल्यानंतर भुसावळातील स्थानिक समर्थकांनी मंगळवारी नाहाटा महाविद्यालय ते संभाजी नगरादरम्यान रॅली काढून जल्लोष केला.

यांची होती उपस्थिती
आर.एस.ग्रुप भुसावळ संस्थापक रोहन राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत रोहित सूर्यवंशी व जयदीप सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते दुचाकी रॅलीत सहभागी झाले.

तर राष्ट्रवादीत फूट पडून भाजप सरकार सत्तेत आले असते ! 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !