शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


भुसावळ : शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील भगीरथ प्राथमिक शाळेतील शंभर मुला-मुलींना तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच खाऊवाटप करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, विभाग प्रमुख अरुण साळुंखे, युवा सेनेचे माजी शहरप्रमुख मिलिंद कापडे, ज्येष्ठ शिवसैनिक हेमंत खंबायत, पवन मेहरा व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत शर्मा (नमा शर्मा) यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. शहर शिवसेनेतर्फे समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्याचा उपक्रम हा कौतुकास्पद असून असे उपक्रम शहर व तालुका शिवसेनेच्या मार्फत राबवणार आहोत, असे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या 27 जुलै रोजी येणार्‍या वाढदिवसानिमित्त भगीरथी हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर तसेच शालेय गणवेश वाटप करणार आहोत, असे नमा शर्मा यांनी जाहीर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगीरथी हायस्कूलच्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !