गुटखासह पान मसाला विक्री करणार्‍यांवर कारवाई


जळगाव : अवैधरित्या गुटखा, पान मसाला तंबाखूची विक्री व साठवणूक करणार्‍या तीन ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी सकाळी छापा टाकून सुमारे 28 हजार 953 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या गुटखा, पान मसाला, गोड सुपारी, तंबाखू आदींची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी 21 जून रोजी सकाळी 11.30 वाजता छापा टाकला. यात जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील जे.के. पान सेंटर, रेल्वे स्टेशनजवळील महानगरपालिकेच्या कॉम्प्लेक्स मधील दोस्ती पान सेंटर आणि एका दुकानावर छापा टाकला. तीन ठिकाणाहून पथकाने सुमारे 28 हजार 953 रुपये किंमतीचा सुगंधित पान मसाला, तंबाखू गुटखा, सुपारी आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

यांच्या विरोधात गुन्हा
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड (वय-42) यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी 21 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता शहर पोलीस ठाण्यात संतोष एकनाथ शेळके (49, शाहूनगर), शरद भागवत पाटील (44, रा.वाघ नगर) आणि रमेश तानाजी पाटील (62, गणेश कॉलनी) या तीन जणांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !