चिंचपूरा शिवारात वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू


पाचोरा : तालुक्यातील चिंचपूरा शेत शिवारात वीज पडल्याने गाय व गोर्‍हा जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

अचानक कोसळली वीज
पाचोरा तालुक्यातील चिंचपूरा परीसरात बुधवार, 22 जुन रोजी संध्याकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून चिंचपुरे येथील शेतकरी वेडुबा ओंकार पाटील यांच्या शेतात एक गायीचा व एक गोर्‍ह्याचा मृत्यू झाला. संध्याकाळच्या वेळी जोरदार वादळ सुरू झाले. पावसाचा अंदाज विजांचा कडकडाट झाला. यावेळी विज अंगावर पडून गायीचा व गोर्‍ह्याचा जागीच मृत्यू झाला.

शेतकर्‍याला भरपाई देण्याची मागणी
विजेचा आवाज एव्हढा भयानक होता की, परीसरातील जनावरे व शेतात काम करणारे शेतकरी धास्तावले होते. या घटनेत परीसरात मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाकडून मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी यांनी केली आहे. पहिल्याच पावसात ग्रामीण भागात शेतकर्‍यांवर संकट कोसळल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !