किनगावातील विवाहितेचा छळ : सात जणांविरोधात गुन्हा


यावल : तालुक्यातील किनगाव सासर असलेल्या विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ
यावलच्या विरार नगरातील सखीनानाज शेख सद्दाम यांचा विवाह शेख सद्दाम शेख शब्बीर यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेने माहेरहून दोन लाख रुपये घर बांधण्यासाठी आणावे, अशी मागणी पती शेख सद्दाम शेख शब्बीर याने केली. पैसे नाही म्हणून विवाहितेला मारहाण करून माहेरी सोडून गेले. शिवाय विवाहितेच्या आई-वडीलांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेने या प्रकरणी पती शेख सद्दाम शेख शब्बीर, सासरे शेख शब्बीर शेख ईस्माईल, सासु सुलतानबी शेख शब्बीर, दिर शेख आरीफ शेख शब्बीर, शेख सुलतान शेख शब्बीर, नणंद फरजानाबी शेख फिरोज आणि नंदोई शेख फिरोज (सर्व रा.किनगाव, ता.यावल) यांच्या विरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार असलम खान करीत आहे.



एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का : शिवसेनेचे अजय चौधरीच गटनेते 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !