पुरी-बलवाडी शिवारात जलसिंचन योजनेच्या साहित्याची चोरी : दोघे आरोपी जाळ्यात
खिर्डी : येथून जवळच असलेल्या पुरी बलवाडी शेती शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या जलसिंचन पाणी योजनेच्या खोलीसमोरून चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक मोटारीसह केबल साहित्याची चोरी करणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यातून जलसिंचन विभागाचे 61 हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. निसार हारून पिंजारी (34), आरीफ हारून पिंजारी (37, दोन्ही रा.आमोदा, ता.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
चोरी करताना आरोपी जाळ्यात
निसार व आरीफ यांना 23 रोजी इलेक्ट्रीक पाण्याची मोटर व त्यातील तांब्याची ची तार व इतर वरील वस्तुची चोरी करताना पकडण्यात आले होते तर चोरी करण्यासाठी अॅपे रीक्षा (क्रमांक एम.एच.19 बी.एम.3740) वापर झाल्यानेदेखील जप्त करण्यात आली. या प्रकरणी पुरी येथील पोलिस पाटील किरण पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ईश्वर चव्हाण करीत आहे.

