भुसावळातील नगरसेवक अपात्रता याचिकेवर आता 1 जुलै रोजी सुनावणी
तारीख पे तारीखमुळे माजी नगरसेवकांमध्ये चलबिचल : आखाडा रंगणार
भुसावळ : पालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी, पालिकेची मुदत संपण्यापूर्वी 17 डिसेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रकरणी 29 डिसेंबरला भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळेंसह, 11 जणांविरुध्द अपात्रता याचिका दाखल केली होती तर याचिकेवर हरकत नोंदवल्यानंतर ती निकाली निघाल्यानंतर शुक्रवार, 24 जून रोजी ही तारीख देण्यात आली मात्र या दिवशीही निकाल लागला नाही तर आता पुढील सुनावणीची 1 जुलै ही तारीख देण्यात आली आहे. या दिवशी संबंधितांना खुलासा सादर करावा लागणार असून ही अंतिम सुनावणी असून यानंतर थेट निकाल येणार असल्याने याकडे शहरातील राजकीय गोटाचे लक्ष लागले आहे.
पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेला आरोपी अखेर अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात
हरकत निघाली निघाली
पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर याचिका दाखल झाल्याने ती रद्द करावी, अशी हरकत या याचिकेवर संबंधित नगरसेवकांनी घेतली होती. ही हरकत जिल्हाधिकार्यांनी निकाली काढली होती तर पुढील सुनावणीची तारीख 24 जून देण्यात आली मात्र 24 रोजी सुनावणी होवून आता 1 जुलै ही सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. शुक्रवारी 11 जणांचे वकिल अॅड.हरीश पाटील व अॅड. महेश भोकरीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी तहकूब करण्याचा अर्ज दिला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी काय निर्णय देतात ? यावर आगामी निवडणुकीत राजकीय दिग्गजांचे भवितव्य अवलंबून आहे.


या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पालिकेच्या 2016 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेले तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे ( प्रभाग 1 – ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब), मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अॅड. बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते ( 22 ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) यांनी 17 डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नगरसेवक पदाचा किंवा पक्षाचा राजीनामा न देता पालिकेची मुदत संपण्यापूर्वी या नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात, तत्कालीन नगरसेविका पुष्पा बतरा यांनी 29 डिसेंबरला अपात्रता याचिका दाखल केली होती.