भुसावळ नगरपरीषदेच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करा : अमोल पाटील


भुसावळ : प्रारूप मतदार यादी रविवारी प्रसिद्ध झाली असलीतरी भुसावळ पालिकेने मात्र ती ऑनलाईन प्रसिद्ध केली नसल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या 10 जून 2022 च्या रानिआ/नप/2022/प्र.क्र 5/का -6 पत्रकानुसार सर्वच जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या सूचनेत म्हटले आहे की, प्रारूप व अंतिम प्रभागनिहाय मतदार यादीस जिल्हाधिकारी व नगरपरीषद/नगरपंचायत यांचे संकेतस्थाळावर प्रसिद्धी द्यावी परंतु भुसावळ नगरपरीषदेच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. यामुळे सामान्य नागरीकाला नगरपरिषद कार्यालय किंवा इतर प्रशासकीय कार्यालयात जाऊन आपले नाव कोणत्या प्रभागात सामील झाले आहे हे तपासावे लागणार आहे. रामटेक नगरपरीषदेने 21 जून 2022 रोजी मूळ प्रारूप प्रभानिहाय यादी फोटोसहित प्रसिद्द केली असून त्या पद्धत्तीने भुसावळ पालिकेनेही दखल घ्यावी, अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त उर्विंदर पाल सिंग मदान यांच्याकडे केली आहे.

शिवसेना पुर्नबांधणीसाठी संपर्क प्रमुख विलास पारकर जिल्ह्यात

उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले : स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !