भालशीव येथील अल्पवयीन मुलीस पळवले
Kidnapped A Minor Girl From Bhalshiv यावल : तालुक्यातील भालशीव गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी सागर सुपडू सपकाळे (पिंप्री, ता.यावल) याच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
किनगावच्या वृद्धेचा खून : आरोपी अखेर एलसीबीच्या जाळ्यात
एकाविरोधात गुन्हा
24 ते 25 जून दरम्यान आरोपी सागर सपकाळे याने भालशीव गावातील अल्पवयीन मुलीस काहीतरी आमिष दाखवून व फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी पीडीतेच्या आईने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.

