वरणगाव फॅक्टरी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी 6 रोजी रीपाइंचे आंदोलन
प्रांताधिकार्यांना निवेदन : शवविच्छेदन अहवालानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीच्या बौद्ध विहारातील उद्यानात झोका खेळताना तो अंगावर पडल्याने समीक्षा अरुण सावळे (6) या बालिकेचा मृत्यू झाला होता. 16 मे 2022 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. वरणगाव ऑर्डनन्स प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व झोक्यांची पाहणी न केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रीपाइंतर्फे 6 जुलै 2022 रोजी वरणगाव बसस्थानक चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दोन वर्षानंतर रेल्वे प्रवाशांना दिलासा : आजपासून मिळणार जनरल तिकीट
गुन्हा दाखल करण्यास विलंब
चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतरही पोलिस प्रशासनास माहिती कळवली नव्हती त्यामुळे कुटुंबियांनी मुलीचा दफनविधी उरकला मात्र ट्रामा केअर सेंटरच्या वैद्यकीय अधिकार्यांना शवविच्छेदन करण्याबाबत अर्ज दिल्यानंतर पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यानंतर आलेल्या अहवालात लोखंडी जड वस्तू लागल्याने समीक्षाचा मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याने वरणगाव फॅक्टरी उद्यानातील झोके व वळणार्या वस्तू प्रशासनाने काढून पुरावा नष्ट केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.


तर 6 रोजी वरणगावात आंदोलन
दोषी प्रशासनावर गुन्हा दाखल न झाल्यास 6 जुलै रोजी वरणगाव बसस्थानक चौफुलीवर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, जिल्हा उपाध्यक्ष शरद सोनवणे, सुरेश जोहरे, सुनील तायडे, पप्पू सुरडकर, विश्वास खरात, सुनील ढिवरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
लाचेचा मोह नडला : चाळीसगाव शहरच्या दोघा पोलिसांना चार हजारांची लाच घेताना अटक