‘डॉक्टर्स डे ’ निमित्ताने भुसावळात 1 रोजी रक्तदान शिबिर
भुसावळ : ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य 1 जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, आयएमए, भुसावळ आणि धन्वंतरी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील आयएमए हॉलमध्ये करण्यात आले आहे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत दात्यांना रक्तदान करता येईल. या शिबिराचे उद्घाटन नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आणि डॉ.सुरेंद्र भिरूड यांच्याहस्ते होईल.
रक्तदान शिबिरात सहभागाचे आवाहन
या रक्तदान महायज्ञात भाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन रोटरी रेलसिटीचे नूतन अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर, सचिव सन्मित पोतदार, प्रकल्प प्रमुख डॉ.नितीन दावलभक्त, आयएमए अध्यक्षा डॉ.अर्चना खानापूरकर, सचिव डॉ.चित्तरंजन चौधरी यांनी केले आहे.

