Say Sambhajinagar Now, Not Aurangabad औरंगाबाद नव्हे आता संभाजीनगर म्हणा ! : ठाकरे सरकारच्या बैठकीत अनेक महत्वाच्या निर्णयांना मंजुरी
Say Sambhajinagar Now, Not Aurangabad ! : Approval of many important decisions in the meeting of Thackeray government मुंबई : ठाकरे सरकार अस्थिर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी सायंकाळी मंत्रालयात झाली. या बैठकीत अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी विविध प्रस्ताव मांडले. त्यानुसार, उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव तर औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर करण्याची मागणी करण्यात आली शिवाय नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारा प्रस्ताव सादर होताच तोदेखील मान्य झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या मागण्यांना यश आले.
जळगावात औषध विक्रेत्याला साडेतीन लाखांचा गंडा
विशेष अधिवेशनापूर्वीच धाडसी निर्णय
शिवसेनेच्या बंडखोरांनी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आणले असताना भारतीय जनता पक्षाने राज्यपालांची भेट घेत महाविकास आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध व्हावे, अशी मागणी करताच ती मान्य करीत राज्यपालांनी गुरुवार, 30 जून रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हे अधिवेशन बोलविण्यात आले आहे. तर, बंडखोर आमदार हे गुवाहाटीहून निघाले असून ते आता गोव्याला जात आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली.

