मुक्ताईनगर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती अध्यक्षपदी आमदार चंद्रकांत पाटील
मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीनुसार मुक्ताईनगर तालुक्याची मुक्ताईनगर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली. या संदर्भातील जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांची स्वाक्षरी असलेले परीपत्रक सोमवार, 27 जून 2022 रोजी मुक्ताईनगर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे.
मुक्ताईनगर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती अशी- अध्यक्ष- आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील, सदस्य- डॉ.जगदीश तुकाराम पाटील, छोटू बाबुराव भोई, अफसर खान मजहर खान, नवनीत दत्तात्रय पाटील, शेषराव जगदेव कांडेलकर, मंगला अशोक (हिरा शेठ) राणे, रुपाली दिलीप चोपडे, आशा राजेंद्र कांडेलकर तसेच तहसीलदार हे पदसिद्ध सदस्य सचिव असतील.
