राष्ट्रीय महामार्गावर अपघात : ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील तिघे ठार
Accident on National Highway: Three killed in truck collision पेठ : भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले. हा अपघात नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848वर मोहाचापाडा फाट्याजवळ गुरुवारी दुपारी घडला.
दुचाकीचा चुराडा : तिघे जागीच ठार
गुरुवारी दुपारी गुजरातकडून नाशिककडे जाणारा ट्रक (एम.एच.12 क्यू.डब्ल्यू.6789) व पेठकडून गुजरातकडे जाणारी दुचाकी (एम.एच.15 एच.एन.7025) यांच्यात कुंभाळे शिवारात मोहाचापाडा फाट्यानजीक समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील रमेश गणपत कडाळी (28, रा.नालशेत, ता.पेठ), निर्मला सोमनाथ गडदे (18, रा.हट्टीपाडा, ता.पेठ व अविनाश कुवर (28, रा.चौसाळा, ता.कापराडा) यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पेठ पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदण्यात आला.
