मुक्ताईनगरात राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी संतप्त : विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन
कुर्हाकाकोडा : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष अॅड.पवनराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गुप्ता यांना धारेवर धरत कृषी पंपाचा तसेच गावठाणांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी निवेदन देण्यात आले. दरम्यान, निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तर तीव्र आंदोलन
पुरनाडा, कोठा, कर्की व अंतुर्ली सबस्टेशनचा वीजपुरवठा गेल्या दोन महिन्यापासून 2बंद स्वरूपाचा असल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांना बसत आहे. मुक्ताईनगर तालुका हा बागाईतदार असल्यामुळे मे व जून महिन्यामध्येच कपाशी व केळीची लागवड होते मात्र निसर्गाच्या लहरी पणाचा व विद्युत वितरणाच्या अनैसर्गिक लहरीपणाचा फटका शेतकर्यांना बसत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठ्या प्रमाणावर जण आंदोलन छेडण्याचा इशारा अॅड.पवनराजे पाटील यांनी दिला आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.पवनराजे पाटील, कार्याध्यक्ष सोपान दुत्ते, तालुका उपाध्यक्ष सोनू पाटील, माजी युवक अध्यक्ष सईद खान, जिल्हा सरचिटणीस विजय कापसे, तालुका सचिव पवन डापके, शहराध्यक्ष बबलू सापंधरे, तालुका सरचिटणीस सोपान कोळी, शिवराज पाटील, संदीप पाटोळे, सारंगराजे, निखील पाटील, नईम खान, विशाल पाटील, आकाश सुरवाडे, पंढरी पाटील, अजय भोई, दीपक पानपाटील, रवी सुरवाडे, तेजस कोळी यांच्यासह राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते.