रावेर तालुक्यातील शेकडो भाविक बसद्वारे पंढरपूरकरडे रवाना


रावेर : आगामी आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी महामंडळाच्या बसद्वारे रवाना झाले आहेत. यावेळी सर्व वारकर्‍यांचा माऊली फाऊंडेशनतर्फे सर्वांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील रमजीपूर, खानापूर येथून स्वतंत्र तीन महामंडळाच्या बसेसद्वारे शेकडो वारकरी पंढरपुरच्या दिशेने पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना झाले. यावेळी माऊली फाऊंडेशनतर्फे सर्व वारकर्‍यांना अन्नदान करून प्रत्येक बससोबत तीन डबे औषधींचे देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ.एस.आर.पाटील, डॉ.संदीप पाटील, रामभाऊ पाटील, मोहन पाटील, सुभाष पाटील, नीलकंठ पाटील, जितेंद्र पाटील, सुभाष पाटील, डॉ.योगीता पाटील, विजय पाटील, पोलिस निरीक्षक कैलास नागरे, नागरे आदींची उपस्थिती होती. प्रसंगी माऊली फाउंडेशनचे डॉ.संदीप पाटील यांनी यात्रेकरूंसाठी प्रसादाचे आयोजन केले. भाविकांना निरोप देण्यासाठी गुड मॉर्निंग ग्रुपचे पद्माकर महाजन, आर.आर.आबा, नितीन महाजन, बाळकृष्ण महाजन, लक्ष्मण पाटील, डॉ.रणजीत पाटील, शैलेंद्र अग्रवाल, स्वामी विवेकानंद विद्यामंदिराचे मुख्याध्यापक राजू पवा, अरुण शिंदे, अविनाश जाधव, डॉ.सुरेश महाजन, डॉ.शांताराम पाटील, अजय पाटील उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !