पिंप्रीनांदू पुलावरून एकाची आत्महत्या
One commits suicide from Pimprinandu bridge मुक्ताईनगर : तालुक्यातील नरवेल येथील 54 वर्षीय प्रौढाने पिंप्रीनांदू येथील पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. गुरुवार, 7 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील ‘कंट्रोल अॅटॅच’
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सूत्रांच्या माहितीनुसार, किशोर तुकाराम तायडे (54, रा.नरवेल) यांनी गुरुवारी दुपारच्या पिंप्रीनांदू येथील पुलावरून उडी घेतल्याने तापी पात्रात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी मयताचा भाऊ याने मुक्ताईनगर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक गजमल पाटील करीत आहेत.
