अल्पवयीन मुलीवर अत्याचार : नराधमांना 20 वर्ष सश्रम कारावास


The Jalgaon court sentenced the perpetrators to 20 years imprisonment जळगाव : अल्पवयीन पीडीतेवर सामूहिक अत्याचार करणार्‍यांना पोक्सो कायद्यांतर्गत 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जळगावच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने शनिवारी सुनावली तसेच 45 हजार रुपये दंड ठोठावला.

दोघांविरोधात दाखल होता गुन्हा
शहरातील एका अल्पवयीन मुलीवर 24 नोव्हेंबर 2019 रोजी आरोपी गणेश कमलाकर सुर्वे (20), प्रकाश सुरेश नागपुरे (22, दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी गोशाळेत फिरायला रीक्षातून नेले व नंतर एका शेतात नेऊन दोघांनी बालिकेवर अत्याचार केला. या संदर्भात पिडीतेने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपी गणेश सुर्वे व प्रकाश नागपुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

पीडीतेसह डॉक्टरांची साक्ष ठरली महत्त्वाची
याप्रकरणी विशेष पोस्को न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयासमोर खटला सुरू होता. या खटल्यात सरकारपक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित व डॉक्टर यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व विशेष सहकारी अ‍ॅड.चारुलता बोरसे यांनी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून युक्तिवाद केला. आरोपीतर्फे विधीज्ज्ञ सागर चित्रे व अ‍ॅड.मंजुळा मुंदळा यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेले पुरावे व प्रभावी युक्तीवाद यामुळे न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच 45 हजार रुपये दंड ठोठोवला. याकामी पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !