Gutkha smuggler in Jalgaon nabbed with Gutkha worth 26 lakhs जळगावातील गुटखा तस्कर 26 लाखांच्या गुटख्यासह जाळ्यात
Gutkha smuggler in Jalgaon nabbed with Gutkha worth 26 lakhs बुलडाणा : जळगावातील दोन गुटखा तस्करांसह तिघांना मेहकरमध्ये 26 लाखांच्या गुटख्यासह पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मध्यप्रदेशातून बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथे एका ट्रकमधून गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचण्यात आला. पोलिसांनी ट्रक (एम.एच.04 ई.बी. 9872) येताचत त्याची तपासणी करीत 26 लाखांचा गुटखा जप्त केला तसेच तिघांना अटक केली.

जळगावात दोघांना अटक
अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी अजय गजानन गोसावी आणि सागर यशवंत औतार हे जळगावातील रहिवासी असून गजानन मापारी हा लोणार येथील रहिवासी आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी केली.
