Sarvodaya Removed The Laptop From The Apartment चोरट्यांची वाढली हिंमत : घरातूनच लांबवले लॅपटॉप


Sarvodaya Removed The Laptop From The Apartment जळगाव : चोरट्यांनी थेट घरात शिरूनच लॅपटॉप लांबवल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला असून या प्रकरणी शनिवार, 20 ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
पंकज मधुकर भुतडा (44, रा. सर्वोदय अपार्टमेंट, प्रताप नगर, जळगाव हे) आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप लांबवला. या संदर्भात शनिवार, 20 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !