Harbing religious sentiments in Garba program: Crime against four persons गरबा कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावल्या : चौघांविरोधात गुन्हा


Harbing religious sentiments in Garba program: Crime against FOUR persons जळगाव : शहरातील एका दुर्गोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सर्वधर्म समभाव संदेश दर्शविण्यासाठी तरुणांनी परीधान केलेल्या वस्त्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वस्त्र परीधान करणार्‍या चौघांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा जणांविरोधात गुन्हा
मोहाडी रस्त्यावरील नेहरु नगरात आयोजित दुर्गोत्सव मंडळात सोमवारी रात्री दोन पुरुषांनी दुसर्‍या धर्मातील महिलांचे वस्त्र परीधान करीत नृत्य केले. तर दोघांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार एका तरुणाने एमआयडीसी पोलिसात केल्यानंतर मंगळवारी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

सर्वांनी जवाबदारीचे भान ठेवावे : पोलिस अधीक्षक
या व्हिडीओच्या माध्यमातून समाजात चुकीचा संदेश पसरवला जात आहे. व्हिडीओचे स्क्रीन शॉट घेऊन काही समाजकंटक तेढ निर्माण करु पाहत आहेत. समाजात शांतता टिकवून ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !